लोकमत24
घरातील आयुर्वेद
१) लसूण-
मुका मार लागल्यावर लसुनाच्या ५ कळ्या व २ ग्राम मीठ वाटून त्याचे दुखऱ्या जागी पोटीस बांधावे. क्षयरोगावर (टी.बी.) सोललेला लसूण १० ग्राम, १ कप ताकात दररोज घेतल्यास क्षयरोग नाहीसा होतो. केसतोडावर- लसूण व मोहऱ्या वाटून लावावे. कर्णशुळावर व कान वाहत असल्यास लसुणच्या २ कळ्या खोबरेल तेलात तळून व गाळून ते तेलाचे ३/४ थेंब कानात टाका.
२) जिरे-
पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते त्यामुळे बरेचदा पातळ संडास होते. अशावेळेस सुंठ, जिरेपूड प्रत्येकी चिमुटभर ग्लासभर पाण्यात उकळून वारंवार पिणे. स्रियांमध्ये श्वेतस्राव होत असल्यास रात्री १ चमचा जिरे ग्लासभर पाण्यात भिजत ठेवणे. सकाळी ते पाणी गळून पिणे. असे १ महिनाभर घेणे. अन्न पचत नसल्यास पाव चमचा जिरेपूड व चिमुटभर हिंग गरम पाण्यासह जेवणापूर्वी घेणे.
३) कारले-
मधुमेहावर(डायबेटिस)कारलीच्या पानाचा रस कप महिनाभर घेतल्यास १ महिन्यात लघवीतून साखर जाते व मधुमेह बरा होतो. मुळव्याधीवार कारलीच्या फळांचा रस ४ चमचे व साखर ४ चमचे एकत्र करून घेतल्यास १ महिन्यात मूळव्याध बरा होतो. हिवतापावर कारलीच्या पानांचा रस चमचे,जिरे चूर्ण ५ ग्राम व गुळ एकत्र करून ३ दिवस घेतल्यास हिवताप बरा होतो.
४) कांदा-
नाकातून रक्त पडत असल्यास पांढरया कांद्याचा रस कपाळास चोळावा व थंड पाण्याची कपड्याची घडी डोक्यावर ठेवावी.नाकातून रक्त जाणे बंद होते. हृदयरोगावर कांद्याचा रस ४ चमचे साखर २० ग्राम व लोणी २० ग्राम १ महिना दररोज घेणे.हृदयरोग बरा होतो. सर्वे प्रकारच्या विषावर पांढरा कांदा व आवळे पोटभर खावे सर्व प्रकारचे विष जाते.
५) हिंग-
जेवण अजीर्ण झाल्यास हिंग, गावरान तूप, गरम पाण्यासह घेणे.लहान बाळाचे पोट दुखत असल्यास हिंगाचे पाणी गरम करून पोटावर लेप देणे. जेवणानंतर पोट दुखत असल्यास हिंग, जिरेपूड, सैधव, तूप जेवणापूर्वी खाल्ल्यास पोट दुखत नाही. दातदुखीवर हिंगाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
६) हळद-
खोकला येत असेल किंवा आवाज बसला असेल तर सुंठ टाकून हळदीचा काढा घ्यावा. सर्दीने घसा खवखवत असेल तर हळदीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. मार लागलेल्या ठिकाणी चांगल्या अवस्थेत म्हणजे झाकून ठेवलेली हळदीची पूड दाबून धरल्यास रक्तस्राव लगेच थांबतो. मुका मार लागल्यास किवा सूज आल्यास हळकुंड पाण्यात उकळून गरम करून त्याचा लेप लावावा. दुधाची साय,हरभरा डाळीचे पीठ,हळद लेप करून लावल्यास चेहऱ्याचा वर्ण उजळतो.
७) सुंठ -
आल्याचा रस किंवा अद्रक बारीक करून साखरेत शिजवून त्याचा आलेपाक बनवतात.हा पाक भूक न लागणे,तोंडाला चव नसणे,पित्तामुळे मळमळणे डोके दुखणे यावर उपयोगी. अजीर्ण झाल्यास आल्याचा रस,लिंबाचा रस व सैंधव मीठ घ्यावे. सर्दी झाल्यास आले, दालचिनी, खडीसाखर यांचा काढा घ्यावा. पित्त मळमळ असल्यास सुंठाचे चूर्ण, साखर सारख्या प्रमाणात घेणे. लहान बाळास दुध पचत नसल्यास १ कपभर दुध चिमुटभर सुंठ, १०-१२ वावडिंग दाणे टाकून उकळून पाजणे.
८) ओवा -
पोटदुखी व अजीर्ण झाल्यास ओवा, कालेमीठ गरम पाण्यासह घेणे. पोटात जंत झाले असल्यास ओवा व नागिणीचे पण खाणे. पोटात गुबारा धरल्यास किंवा भूक लागत नसेल तर ओवा, चिमुटभर हिंग, सैधव मीठ गरम पाण्या बरोबर घेणे.
९) जेष्ठमध -
वारंवार खोकला येत असल्यास जेष्ठमध चूर्ण किंवा काडी ३-४ वेळेस चघळणे. मलप्रवृत्ती साफ होण्यास जेष्ठमध चूर्ण प्रत्येकी अर्धा चमचा रात्री झोपताना घेणे.
१०)देशी गाईचे तूप-
गायीचे तूप सर्वात उत्तम. अन्नाचे पचन होते, भूक वाढते. तुपाने स्निग्धता येते. उन्हाळ्यात तळपायाची आग होत असेल तर शतधौत घृत चोळावे. आग कमी होते.
लोकमत24
शरीरात जास्त उष्णता झाली असेल तर हे १४ उपाय करा
१) दररोज रात्री काळी मनुके कोमट पाण्यात भिजत घालायचे सकाळी ते पाणी आणि मनुके खायचे.
२) दररोज दुपारच्या जेवणामध्ये ताक पोटात जायला हवे. रात्रीच्या जेवणा मध्ये नाही.जिऱ्याचे पाणी दिवसभर थोडं थोडं प्यावे.
३) सब्जा रात्री काचेच्या भांड्यामध्ये भिजत घालून सकाळी खडीसाखर घालून अनुशापोटी घ्यावे.दोन्ही वेळचे जेवण लवकरच घ्यावीत.
४) जेवणामध्ये भात घेतला तर उष्णतेचे विकार व्हायची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. फळांमध्ये कलिंगड, ताडगोळे, द्राक्ष, डाळींब इत्यादी खावे.
जेवणामध्ये पुदिन्याची चटणी घ्यावी.
५) फणस आणि अननस ही फळ उष्णता वाढवतात. ही फळ कुठल्या तरी त्यांच्या पदार्थ रूपांमध्ये खायची.
अननसाचे सरबत, फणसाची पोळी इत्यादी.तहान लागली नसेल तरी भरपूर पाणी प्यावे.
६) लिंबाचे सरबत, कोकम सरबत घ्या. ज्या शक्य आहे त्या गोष्टी सकाळच्या नाष्ट्यानंतर घेतल्या तर त्याचा उपयोग शरीरासाठी खूप चांगल्या प्रमाणात होतो.
नाकामधून रक्त येणाऱ्यांनी डोक्यावरती पाणी मारावे.
७) ज्यांना खूपच प्रमाणात उष्णतेचा त्रास होतो त्यांनी अंघोळ केल्यावर ती ओल्या अंगाने पाच मिनिटे तसेच थांबावे.
नंतर थंडावा प्राप्त होतो. सकाळ संध्याकाळ दोन वेळ अंघोळ करावी.
८) रात्री झोपताना उजव्या कुशीवर झोपले तर चंद्रनाडी चालू राहून शरीरामध्ये गारवा निर्माण होतो.
९) मसाले, आंबट, खारट, तिखट कमी प्रमाणातच घ्यावे. रोजच्या जेवणामध्ये फोडणीला जिरं जास्त प्रमाणात वापरावे.
मोहरी, हळद, हिंगाचा वापर कमी ठेवावा. मसाल्याच्या ऐवजी धने-जिरे याची पावडर वापरावी.
१०) खूप प्रमाणात तोंडामध्ये काही पुळ्या येतात तोंड आले असे म्हटले जाते. सर्वात आधी पोट साफ ठेवावे.
आणि अगदीच शक्य नसेल त्यांनी बी कॉम्प्लेक्स च्या गोळ्या घ्याव्या.
११) जे लोक कॅल्शियम घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शिअमच्या गोळ्यांची पॉवर कमी घ्यावी. पण फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच.
१२) उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ अनेकांना व्हायची शक्यता असते. त्यावर एक उत्तम उपाय म्हणजे आपण अनेक वेळा सांगितलेला सब्जा हेच आहे. ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी नुसताच सब्जा घ्यावा.
१३) उन्हाळ्यामध्ये लघवीला जळजळ अनेकांना व्हायची शक्यता असते. त्यावर एक उत्तम उपाय म्हणजे आपण अनेक वेळा सांगितलेला सब्जा हेच आहे. ज्यांना गोड आवडत नसेल त्यांनी नुसताच सब्जा घ्यावा.
१४) दुपारच्या जेवणामध्ये ताक - भात खाल्ल्याने सुद्धा शरीरामध्ये गारवा मिळतो. कधीकधी नाईलाजाने आपल्याला स्पायसी फूड म्हणजे मसालेदार पदार्थ खावे लागतात आणि ते खाण्यात आल्यावर थोड्यावेळाने लगेच कोकम सरबत घ्यावे.
सुचना - सर्वच उपाय एकाचवेळी करु नयेत.
पोटाच्या तक्रारी,पोट साफ करण्याचे १३ प्रभावी उपाय,हमखास परिणाम पोटाच्या विविध समस्यांनी अनेकजण त्रस्त आहेत.त्यातील पोट साफ न होणे ही समस्या तर अगदी सामान्य बनलेली आहे या आणि इतर समस्यांसाठी रामबाण उपाय पाहूया. १) भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या. २) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते. ३) मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे. ४) एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे. ५) रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या. ६) १०० मि. लि. पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चाऊन खावे, याने सकाळी पोट साफ होते. ७) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे. ८) दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे आणि वरून दूध घ्यावे. ९) रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होईल. १०) रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते. ११) त्रिफळा चूर्ण मातीच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते. १२) रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते. १३) ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते. वरील उपाय करावेत आणि आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.
स्वयंपाकघरातील १७ महत्वपूर्ण किचन ट्रीक्स आणि टीप्स नक्कीच उपयोगी पडतील.
१) मोकळा भात कसा शिजवावा-
खूप महिलांची अशी तक्रार असते की, भात मोकळा होत नाही. शिजल्यावर भात एकदम गच्च होतो. जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकणाशिवाय भांड्यात शिजवा. जर असं शक्य नसल्यास भात लावताना त्यात लिंबू पिळावा किंवा त्यात तूप घालावं. यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही.
२) लिंबाचं सरबत अजून छान कसं बनवता येईल-
लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचं सालं ही किसून घालावं.यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागेल. तसंच लिंबाच्या सालातील सत्त्व ही आपल्याला मिळेल.
३) आल्याची पेस्ट कशी साठवावी-
आल्याची पेस्ट घातल्याने पदार्थाला चांगलाच झणका येतो. त्यामुळे अनेक पदार्थात आल्याची पेस्ट घातली जाते. जर तुम्हाला आल्याची पेस्ट खूप दिवसांसाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा मोहरीचं तेल मिक्स करावं. यामुळे आल्याची पेस्ट खराब होत नाही.
४)अंडी उकडताना न फुटण्यासाठी-
जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका. अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत. मग अंडी छान उकडली जातील.
५) मिक्सरच्या ब्लेडला धारदार करण्यासाठी-
काही वेळा मिक्सर वारंवार वापरल्यामुळे त्यातील ब्लेड खराब होतं आणि धार कमी होते. हे टाळण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून किमान एकदा मीठ घालून ते फिरवून घ्या. यामुळे ब्लेडची धार चांगली होईल.
६) कुरकुरीत भेंडी बनवण्यासाठी-
भेडीची भाजी बनवताना त्याचा चिकटपणा जावा यासाठी ही भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये. जेव्हा भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा भाजीत तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता. असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि चविष्टही लागेल.
७) एखादा पदार्थ लागल्यामुळे भांड खराब झाल्यास-
जर जेवण बनवताना एखादा पदार्थ जळल्यामुळे भांड खराब झाल्यास ते स्वच्छ करणं कठीण जातं. असं झाल्यास चहा करून उरलेल्या चोथा आणि पाणी त्या भांड्यात काहीवेळ घालून ठेवा. त्यानंतर स्वच्छ करा भांड अगदी चमकेल.
८) जेव्हा जेवणात जास्त मीठ पडतं-
जर जेवणात कमी मीठ पडलं तर वरून घालता येतं पण जर जेवणात मीठ जास्त झालं तर प्रश्नच निर्माण होतो. जर रस्सा भाजी असेल तर त्यात थोडा उकडलेला बटाटा घालावा किंवा कणकेचा छोटा गोळा घालावा. यामुळे जास्त झालेलं मीठ शोषलं जाईल आणि भाजीमध्ये काही बदल होणार नाही. पण हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या की, थोड्यावेळाने कणकेचा गोळा किंवा बटाटा आठवणीने काढा. जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेलं बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता.
९) पास्ता किंवा न्यूडल्स शिजवताना चिकट झाल्यास-
जर शेवया, पास्ता किंवा न्यूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं. गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धूवून घ्या. मग बघा अगदी बाहेरसारखे न्यूडल्स घरी बनतील.
१०) विरजणाशिवाय दही कसं लावावं-
जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचं असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या त्यात लिंबाचा रस घालून पातेलं 10 ते 12 तास झाकून ठेवा. मस्त सायीचं दही लागेल.
११) लसणाचा योग्य उपयोग-
जर जेवणांमध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही. अशावेळी लसूण कापून घालण्याऐवजी कूटून किंवा किसून घालावा. असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो.
१२) चहा बनवल्यावर चहाचा चोथा टाकू नका-
अनेकदा लोक चहा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात. पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता. चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या, लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता.
१३) सुकामेवा चांगल्यारीतीने कसा ठेवाल-
तुम्ही पाहिलं असेल की, बरेचदा सुकामेवा बरेच दिवस राहिल्यास त्याची पावडर होते किंवा बुरशी लागते. असं होऊ नये याकरिता सुकामेवा नेहमी एअर टाईट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये ठेवावा.
१४) कोशिंबीर आंबट होऊ नये-
जेव्हा पाहूणे येण्याआधी आपण कोशिंबीर बनवून ठेवतो, पण ती बरेचदा आंबट होते. लक्षात घ्या, हे टाळण्यासाठी दह्यांमध्ये आधीच सर्व साहित्य घाला पण मीठ घालू नका. कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही.
१५) मऊ ईडल्या बनवण्यासाठी-
ईडली मऊ आणि फुगण्यासाठी होण्यासाठी त्याच्या पीठात थोडे उकलेले तांदूळ वाटून घाला. तसंच ईनो किंवा बेकींग सोडा घाला. असं केल्याने ईडल्या मऊ होतील आणि टम्म फुगतील
१६) कांदा कापताना डोळ्यातील अश्रू टाळण्यासाठी-
जर तुम्ही कांदा योग्य रीतीने कापल्यास तुमच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही. याकरिता कांद्याचं वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा चिरल्यास सोपं होतं. तसंच तुमच्या डोळ्यात पाणीही येणार नाही.
१७)झटपट छोले किंवा राजमा बनवण्यासाठी-
कडधान्य म्हणजेच छोले, राजमा, वाटाणे किंवा चणे हे रात्रभर भिजत ठेवावे लागतात. पण जर तुम्ही ते रात्री भिजत घालायला विसरलात तर चिंता नाही. गरम पाण्यात जर चणे किंवा राजमा भिजवा. त्यानंतर एका तासातच तुम्हाला आरामात त्याची भाजी करता येईल.
धन्यवाद
चरबी /वजन झटपट कमी करायचे असेल तर खा हे १२ पदार्थ,पोटॅशियमचे प्रचंड स्त्रोत
पोटॅशियम हे एक खनिज (minerals) आहे. हे इलेक्ट्रोलाइट बॅलेन्स वाढवून चयापचय (metabolism) क्रियेत मदत करते. आपले हृदय आणि किडनी योग्यरित्या कार्य करत राहावे यासाठी शरीरात पोटॅशियमचे प्रमाण चांगले असणे अत्यंत आवश्यक असते. तज्ञ म्हणतात की पोटॅशियम वजन कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे. एका अभ्यासानुसार, आहारात पोटॅशियम घेतल्याने वाढलेला BMI कमी होतो. पोटॅशियमने समृद्ध असणारे वाढलेले वजन/ चरबी कमी करणारे पदार्थ पाहूया.
१) अळशीच्या बिया -
अळशीच्या बिया पोटॅशियमने समृध्द असं सुपर फूड आहेत. ते स्मूदी मध्ये कच्चं मिसळून किंवा स्मूदी सोबत मिक्सर मध्ये बारीक करून खाऊ शकता. दररोज काही प्रमाणात अळशीच्या बियांचे सेवन करणे वजन कमी करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे. अळशीच्या बिया खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होऊन पोट साफ राहते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी जळून जाते. अळशी हा फायबरचा सुद्धा एक जबरदस्त स्त्रोत आहे.
२) लाल रंगांची फळे -
चेरी, स्ट्रॉबेरी, रासबेरी, टरबूज, सफरचंद अशा लाल रंगाच्या फळांमध्ये असणारे काही घटक पोटावरची चरबी कमी करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जे मिळेल ते लाल रंगाचे फळ दिवसातून एकदा तरी खावं.
३) छोले -
लवकरात लवकर वजन कमी करण्यासाठी तुम्ही छोले खाऊ शकता. यात पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. छोले रात्रभर भिजवा. सकाळच्या नाश्त्यामध्ये इतर सामग्री सोबत ते मिसळून चाट सारखं खाल्ल्याने वजन झटपट कमी होण्यास मदत मिळेल. लक्षात ठेवा, हे छोले चाट चटकदार आणि मसालेदार बनवणे शक्यतो टाळा. त्यात जास्तीत जास्त निरोगी पदार्थ घालण्याचा प्रयत्न करा.
४) केळी -
केळी हे एक असे फळ आहे जे वर्षभर उपलब्ध असते. आयर्न आणि पोटॅशियमचा स्त्रोत असण्याच्या दृष्टीने हे आपले वजन कमी करण्याची इच्छा सहज पूर्ण करण्यात मदत करते. तुम्ही केळी कच्ची खाऊ शकता किंवा कडधान्यांमध्ये मिसळून खाऊ शकता हे देखील खूप फायदेशीर ठरते.
५) रताळे -
रताळे म्हणजे वजन कमी करण्याचा एक सर्वोत्तम मार्ग आहे. पोटॅशियम युक्त हे कंदमुळ फक्त वाफवून काही मसाल्यां सोबत खाल्ले जाऊ शकते, शिजवून दुधासोबत खाऊ शकता किंवा मग भाजूनही खाता येतात. यूएसडीएच्या मते, 100 ग्रॅम रताळ्यां मध्ये 337 मिलीग्रॅम पोटॅशियम असते. जर तुम्ही काही काळ नियमितपणे रताळे खाल्ले तर तुम्हाला नक्कीच सपाट पोट व कंबर मिळेल.
६) राजमा -
राजमा पोटॅशियम सोबतच प्रथिनांनी (protein) समृद्ध स्रोत आहे. आपल्या आहारात राजमा समाविष्ट केल्याने शरीराला आपल्या दैनंदिन पोटॅशियमच्या गरजेपैकी 35 टक्के भाग मिळतो. साधारणपणे लोकांना राजमा भाताबरोबर खायला आवडतो. आपण इच्छित असल्यास, आपण चपाती किंवा इतर घटकांमध्ये मिसळून सुद्धा त्याचे सेवन करू शकता. जर तुम्हाला ते दररोज खाणे शक्य नसेल तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा खाल्ले तरी लठ्ठपणापासून खूप लवकर मुक्ती मिळेल. वजन कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वर नमूद केलेले पदार्थ नियमितपणे समाविष्ट करू शकता. या सर्व पदार्थांमुळे तुमचा फक्त लठ्ठपणाच कमी होणार नाही तर तुम्ही निरोगीही राहू शकाल.
७) मासे आणि अॅव्होकेडो-
केवळ पोटॅशियमच नाही तर मासे हे ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा देखील उत्कृष्ट स्त्रोत आहेत. माशांमध्ये कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे एक आदर्श अन्न आहे. अॅव्होकाडो हे फळ बर्याच लोकांना आवडत नाही पण वजन कमी करण्यासाठी हे खूप लाभदायक फळ आहे. हे एक अतिशय क्रीमी आणि चवदार फळ आहे. हे फळ बहुतेक वेळा मॅश केले जाते आणि स्प्रेड म्हणून वापरले जाते. डीप करण्यासाठी तुम्ही ते इतर पदार्थां मध्ये सुद्धा मिसळू शकता.
८) दालचिनी --
दालचिनी खाल्ल्याने पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुधारते. त्यामुळे नियमितपणे थोडी दालचिनी तरी आहारात घेतलीच पाहिजे. दालचिनी घातलेला चहा मसाला केला आणि तो रोज दिवसातून एकदा चहामध्ये चिमुटभर टाकला तरी उत्तम.
९) सफरचंद –
सफरचंद हे एक असे फळ आहे जे पोटाची चरबी कमी करते. सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते व आपले पोट बराच काळ भरलेले राहते. तसेच सफरचंदामध्ये कॅलरीज आणि साखर अतिशय कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास प्रोत्साहन मिळते. त्यामध्ये असलेले फ्लेवोनॉइड्स हे पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते.
१०) दही –
वजन कमी करण्याच्या आहारात समावेश करण्यासाठी दही हे एक उत्तम दुग्धजन्य पदार्थ आहे. दह्यमध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया देखील असतात जे आतड्याचे कार्य सुधारतात, तसेच जळजळ आणि लेप्टिन प्रतिरोधापासून संरक्षण करतात, ज्यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. वजन कमी करण्यासाठी दह्याचे सेवन उपयुक्त ठरते.
११) ओट्स –
ओट्स हे वजन कमी करणारे सुपरफूड मानले जाते कारण त्यामध्ये प्रोटीन भरपूर असते आणि कॅलरीज कमी असतात. त्यामुळे जर तुम्हाला सपाट पोट हवं असेल तर आहारात ओट्सचा समावेश करा.ओट्सचे सेवन केल्याने आपले पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे इतर जंक फूड किंवा अनहेल्दी पदार्थ खाणे, टाळलं जातं. ओट्स आपल्याला दिवसभर उर्जा देखील प्रदान करतात आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
स्वस्थ व आरोग्यदायी राहण्यासाठी हे 33 नियम लक्षात ठेवा आजार जवळ येणारच नाहीत
*(१)* सकाळी पाणी, दुपारी ताक, संध्याकाळी घ्या दुधाचा घोट, हिच आहे आपल्या निरोगी जीवनाची खरी नोट.
*(२)* ९०% आजार हे पोटातून होतात, पोटात ॲसिडीटी, कब्ज नसला पाहिजे, पोट स्वच्छ, साफ तो आरोग्याचा राजा.
*(३)* शरीरात न धरता येणारे १३ वेग आहेत. याचा विचार करा.
*(४)* १६० प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा.
*(५)* ८० प्रकारचे आजार नुसत्या चहा पिण्याने होतात. हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे.
*(६)* ४८ प्रकाचे रोग ॲल्युमिनियमची भांडी वापरल्याने होतात. त्यात आपण ही भांडी सर्रास वापरतो. ही भांडी ब्रिटिश आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत होते.
*(७)* तसेच दारू, कोल्ड्रिंक, चहा याच्या अति सेवनाने हदय रोग होऊ शकतो.
*(८)* मॅगिनॉट, गुटका, सारी, डुक्कराचे मांस, पिज्जा, बर्गर, बिडी, सिगारेट, पेप्सी, कोक यामुळे मोठे आतडे सडते.
*(९)* जेवण झाल्यावर लगेच स्नान करु नये यामुळे पाचनशक्ती मंद होते, शरीर कमजोर होते.
*(१०)* केस रंगवू नका, हेअर कलरने डोळ्यास त्रास होतो, कमी दिसू लागते.
*(११)* गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. गरम पाणी कधीही डोक्यावरुन घेऊ नये डोळे कमजोर होतात.
*(१२)* स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नका कारण पॅरालिसिसचा, हदयाचा ॲटक येऊ शकतो. प्रथम पायावर, गुडघ्यावर, मांडीवर, पोटावर, छातीवर, खांद्यावर, पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घ्यावे त्यामुळे डोक्यातून रक्तसंचार पाया कडे होता व त्रास होत नाही, चक्कर येत नाही.
*(१३)* उभ्याने कधीही पाणी पिऊ नये टाच कायमची दुखु लागते.
*(१४)* जेवताना वरुन कधीही मीठ घेऊ नये त्यामुळे चक्तचाप, ब्लडप्रेशर वाढतो.
*(१५)* कधीही जोराने शिंकू नये नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो.
*(१६)* रोज सकाळी तुळशीचे पाने खावीत कधीच सर्दी, ताप, मलेरिया होणार नाही
*(१७)* जेवणानंतर रोज जुना गुळ आणि सौफ खावी पचन चांगले होते व ॲसिडिटी होत नाही.
*(१८)* सतत कफ होत असेल तर नेहमी मुलहठी चघळावी कफ बाहेर पडतो व आवाज चांगला होतो.
*(१९)* नेहमी पाणी ताजे प्यावे, विहीरीचे पाणी फार चांगले, बाटलीबंद फ्रिज मधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसानसांत त्रास होतो.
*(२०)* पाण्याने होणारे रोग यकृत, टायफॉइड, शस्त्र, पोटाचे रोग या पासून लिंबू आपल्याला वाचवते.
*(२१)* गहूचा चीक, गहूचे कोंब खाण्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
*(२२)* स्वयंपाक झाल्यावर ४८ मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीशी होतात.
*(२३)* मातीच्या भांडयात स्वयंपाक केल्यास १००% पोषकतत्वं, काशाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९७% पोषकतत्वं, पिताळाच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ९३% पोषकतत्वं, अल्युमिनियमच्या भांडयात स्वयंपाक केल्यास ७ ते १३% पोषक तत्वं असतात
*(२४)* गव्हाचे पीठ १५ दिवस जुने झालेले वापरू नये.
*(२५)* १४ वर्षाच्या खालील मुलांना मैदयाचे पदार्थ बिस्किटं, सामोसा व इतर पदार्थ खावू घालू नये.
*(२६)* खाण्यास सैंधा मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळेमीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते.
*(२७)* भाजलेल्या ठीकाणी बटाट्याचा रस, हळद, मध, घृतकुमारी, यातील काही लावले तर थंड वाटते व व्रण पडत नाही
*(२८)* पायाचा अंगठा सरसूच्या तेलाने चोळल्यास डोळ्याची आग, खाज, लाली बरी होते.
*(२९)* खाण्याचा चुना ७० प्रकारचे रोग बरे करतो.
*(३०)* कुत्रा चावल्यास तेथे लगेच हळद लावा.
*(३१)* लिंबू, सरशी तेल, हळद, मीठ एकत्र करुन दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात, व सर्व दाताचे आजार बरे होतात. डोळ्याचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये.
*(३२)* फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते. पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात.
*(३३)* सकाळचे भोजन राजासारखे म्हणजे पोटभर तर दुपारचे भोजन राजकुमारासारखे म्हणजे लहान मुलासारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे म्हणजे खूप कमी असावे.
२८ दिवसात परफेक्ट बॉडी मिळवण्याचा डाएट प्लॅन,वजन कमी करताना दिवसभर कधी काय खावे
28 Days Weight Loss Diet Plan. अनेकांचा असा समज असतो की, शरीराच्या आरोग्यासाठी मांस खाणे अत्यंत आवश्यक आहे आणि वनस्पती-आधारित अन्न शरीराला योग्य पोषण देण्यासाठी पुरेसे नाही. जर तुम्ही फिट होऊन परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आज आपण २८ दिवसांचा डाएट प्लॅन पाहणार आहोत. विशेष म्हणजे हा प्लॅन पूर्णतः शाकाहारी आहे.
कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवून कर्करोग आणि इतर भयानक रोगांचा धोका कमी करण्यात मदत करणारा हा प्लॅन असल्याचे डॉक्टर सांगतात. तसेच यामुळे हे रक्तातील साखरेचे प्रमाण स्थिर राहून टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका सुद्धा कमी होतो.
*पहिले तीन दिवस शरीर आतून स्वच्छ करण्यासाठी सकाळी ६ वाजता उठल्यावर...*
एक ग्लास कोमट पाण्यात तुळशी, पुदिना आणि लिंबाचा रस मिसळून प्या.
*६.३० वाजता...*
एक वाटी डाळिंब/खरबूज/लिंबूवर्गीय फळे, शक्यतो हंगामी.
*ब्रेकफास्ट साठी सकाळी 8 वाजता...*
एक ग्लास भाज्यांचा रस (काकडी, भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी उपयुक्त अशी एक वनस्पती, पालक आणि लिंबू किंवा दुधी आणि आवळा.)
*सकाळी १०. ३० वाजता...*
एक ग्लास नारळ पाणी.
*दुपारचे जेवण, दुपारी १ वाजता...*
सॅलडसह वाफवलेल्या स्प्राउट्सची मोठी वाटी.
*दुपारच्या जेवणानंतर, दुपारी 2.30 वाजता...*
एक ग्लास ताक (दोन चमचे घरगुती लो फॅट दही. (गाईचे दूध वापरून बनवलेले) जिरेपूड, काळी मिरी, पुदिना आणि धणे)
*संध्याकाळी, ४ वाजता...* एक कप ग्रीन टी किंवा आल्याचा चहा.
*संध्याकाळी ५ वाजता...*
4-5 बदाम आणि 2-3 अक्रोड.
*रात्रीचे जेवण, संध्याकाळी ७ वाजता...*
एक वाटी भाज्यांचे सूप + वाफवलेल्या किंवा शॅलो फ्राय केलेल्या भाज्या.
*झोपण्याची वेळ, रात्री ९ वाजता...*
1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू पिळून प्या.
*क्लेनसिंग डाएट: पहिला आठवडा...*
*सकाळी ६ वाजता उठल्यावर...*
दोन कप पाण्यात 1 कप जिरे, एक इंच आले + 1⁄4 चमचे हळद + चिमूटभर काळी मिरी घालून उकळून घ्या. कोमट झाल्यावर त्यात १ मध्यम लिंबू आणि तुळशीच्या पानाचा रस घाला व प्या.
*६. ३० वाजता...*
एक वाटी फळे, शक्यतो हंगामी फळे, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, खरबूज.
*ब्रेकफास्ट, सकाळी ८ वाजता...*
भाज्या, टोमॅटो, लसूण आणि मशरूमसह ओट्स १ वाटी
*सकाळी १०. ३० वाजता...*
एक ग्लास अननस ज्यूस /नारळ पाणी.
*दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता...*
एक वाटी सॅलड (200 ग्रॅम भाजलेले तीळ, अंबाडी, सूर्यफुलाच्या बिया मिसळून) + डाळ/राजमा/चणे (1 लहान वाटी) + 1 नाचणी /ज्वारीची भाकरी.
*दुपारच्या जेवणानंतर, दुपारी २.३० वाजता...*
एक ग्लास ताक. (जिरेपूड, काळी मिरी, पुदिना आणि धणे घालून)
*संध्याकाळी, ४ वाजता...*
एक कप ग्रीन टी/कॅमोमाइल, लेमन ग्रास टी.
*संध्याकाळी ५ वाजता...*
4-5 बदाम, 2-3 अक्रोड, मखना.
*रात्रीचे जेवण, संध्याकाळी 7 वाजता...*
एक वाटी भोपळा आणि मसूर सूप आणि एक वाटी बीटरूट, काकडी आणि पातीच्या कांद्यासह स्प्राउट्स
*झोपण्याची वेळ, रात्री 9 वाजता...*
1 ग्लास कोमट पाण्यात लिंबू मिसळून प्या.
*दुसरा आठवडा...*
*सकाळी ६ वाजता उठल्यावर...*
एक ग्लास कोमट पाण्यात भिजवलेले मेथी दाणे
*६. ३० वाजता...*
फळांची वाटी. (हंगामी फळे, अननस आणि खरबूज)
*ब्रेकफास्ट, सकाळी 8 वाजता...*
एक वाटी क्विनोआ चेरी टोमॅटो, पिवळी शिमला मिरची आणि कोथिंबीर घालून
*सकाळी १०. ३० वाजता...*
एक संत्रे.
*दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता...*
ऑलिव्ह ऑइलमध्ये शॅलो फ्राय करून मशरूम, फरसबी, गाजर, लसूण आणि पातीच्या कांद्यासह एक वाटी ब्राऊन राईस वापरून फ्राईड राईस बनवू शकता
*संध्याकाळी, 4 वाजता...*
एक वाटी डाळिंब.
*संध्याकाळी 5...*
4-5 बदाम आणि 2-3 अक्रोड
*रात्रीचे जेवण, 7 वाजता...*
अर्धा एवोकॅडो, काकडी, सिमला मिरची, टोफू, धणे, तीळ, सूर्यफूल बिया आणि भोपळ्याच्या बियांनी बनलेले ब्रोकोली सूप आणि सॅलडची एक वाटी.
झोपण्याची वेळ, रात्री 9: 1 ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस.
झोपा, रात्री 10 वा.
*तिसरा आठवडा...*
*सकाळी ६ वाजता उठल्यावर...*
1 ग्लास कोमट पाणी + 1 मध्यम लिंबाचा रस/ चिमूटभर दालचिनी.
*सकाळी ६.३० वाजता...*
एक वाटी फळे (हंगामी फळे, मनुका, पीच, पपई)
*ब्रेकफास्ट , सकाळी 8 वाजता...*
एक वाटी एवोकॅडो + काकडी + सेलेरी 1 टेबलस्पून चिया सीड्स आणि 5-6 स्ट्रॉबेरी.
*सकाळी 10.30 वाजता...* एक ग्लास कलिंगडाचा रस किंवा नारळ पाणी पिणे.
*दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता...*
कोशिंबीर (200 ग्रॅम) + हंगामी भाज्या + डाळ/राजमा/छोले (1 लहान वाटी + 1 नाचणी /ज्वारी भाकरी)
*संध्याकाळी, 4 वाजता...* एक कप हिबिस्कस फ्लॉवर चहा/दालचिनी चहा + 6-7 मखना.
*संध्याकाळी 5 वाजता...* 4-5 बदाम + 2-3 अक्रोड.
*रात्रीचे जेवण, संध्याकाळी 7 वाजता...*
एक वाटी मशरूम सूप. वाफवलेले किंवा फ्राय केलेली ब्रोकोली, झुकिनी, शतावरी, बीट, रताळे असे सगळे ताहिनी सॉससह ब्लॅक ऑलिव्ह तेलावर परतून घ्या. यात मिरपूड आणि हिमालयीन मीठ ऍड करा.
*झोपण्याची वेळ, रात्री 9 वाजता...*
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्या.
*चौथा आठवडा...*
*सकाळी ६ वाजता उठल्यावर...*
एका ग्लास कोमट पाण्यात बडीशेप/ओवा.
*सकाळी ६. ३० वाजता...* फळांची वाटी. (हंगामी फळे, केळी, चेरी)
*ब्रेकफास्ट , सकाळी 8 वाजता...*
काकडी, चेरी टोमॅटो आणि एक मध्यम कप स्प्राऊट्स.
*सकाळी 10 वाजता...*
एक मध्यम आकाराचे सफरचंद.
*दुपारचे जेवण, दुपारी 1 वाजता...*
कोशिंबिर, बीट, सोयाबीनचे, jalapeño सह एक वाटी सॅलड. एक वाटी भाजी, डाळ आणि एक नाचणीची भाकरी.
*संध्याकाळ, 4 वाजता...*
एक कप ग्रीन टी+ मूठभर भाजलेले चणे.
*संध्याकाळी 5 वाजता...*
4-5 बदाम + 2-3 अक्रोड.
*रात्रीचे जेवण, संध्याकाळी 7 वाजता...*
एक वाटी टोमॅटो सूप. ब्राऊन राईससह भाज्या घालून खिचडी एक वाटी. हंगामी भाज्या, भोपळा आणि सूर्यफूल बिया घातलेले सॅलेड.
*झोपण्याची वेळ, रात्री 9 वाजता...*
एक ग्लास कोमट पाण्यात लिंबू आणि आल्याचा रस घालून प्या.