लोकमत24
घरातील आयुर्वेद
१) लसूण-
मुका मार लागल्यावर लसुनाच्या ५ कळ्या व २ ग्राम मीठ वाटून त्याचे दुखऱ्या जागी पोटीस बांधावे. क्षयरोगावर (टी.बी.) सोललेला लसूण १० ग्राम, १ कप ताकात दररोज घेतल्यास क्षयरोग नाहीसा होतो. केसतोडावर- लसूण व मोहऱ्या वाटून लावावे. कर्णशुळावर व कान वाहत असल्यास लसुणच्या २ कळ्या खोबरेल तेलात तळून व गाळून ते तेलाचे ३/४ थेंब कानात टाका.
२) जिरे-
पावसाळ्यात पचनशक्ती कमी होते त्यामुळे बरेचदा पातळ संडास होते. अशावेळेस सुंठ, जिरेपूड प्रत्येकी चिमुटभर ग्लासभर पाण्यात उकळून वारंवार पिणे. स्रियांमध्ये श्वेतस्राव होत असल्यास रात्री १ चमचा जिरे ग्लासभर पाण्यात भिजत ठेवणे. सकाळी ते पाणी गळून पिणे. असे १ महिनाभर घेणे. अन्न पचत नसल्यास पाव चमचा जिरेपूड व चिमुटभर हिंग गरम पाण्यासह जेवणापूर्वी घेणे.
३) कारले-
मधुमेहावर(डायबेटिस)कारलीच्या पानाचा रस कप महिनाभर घेतल्यास १ महिन्यात लघवीतून साखर जाते व मधुमेह बरा होतो. मुळव्याधीवार कारलीच्या फळांचा रस ४ चमचे व साखर ४ चमचे एकत्र करून घेतल्यास १ महिन्यात मूळव्याध बरा होतो. हिवतापावर कारलीच्या पानांचा रस चमचे,जिरे चूर्ण ५ ग्राम व गुळ एकत्र करून ३ दिवस घेतल्यास हिवताप बरा होतो.
४) कांदा-
नाकातून रक्त पडत असल्यास पांढरया कांद्याचा रस कपाळास चोळावा व थंड पाण्याची कपड्याची घडी डोक्यावर ठेवावी.नाकातून रक्त जाणे बंद होते. हृदयरोगावर कांद्याचा रस ४ चमचे साखर २० ग्राम व लोणी २० ग्राम १ महिना दररोज घेणे.हृदयरोग बरा होतो. सर्वे प्रकारच्या विषावर पांढरा कांदा व आवळे पोटभर खावे सर्व प्रकारचे विष जाते.
५) हिंग-
जेवण अजीर्ण झाल्यास हिंग, गावरान तूप, गरम पाण्यासह घेणे.लहान बाळाचे पोट दुखत असल्यास हिंगाचे पाणी गरम करून पोटावर लेप देणे. जेवणानंतर पोट दुखत असल्यास हिंग, जिरेपूड, सैधव, तूप जेवणापूर्वी खाल्ल्यास पोट दुखत नाही. दातदुखीवर हिंगाच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात.
६) हळद-
खोकला येत असेल किंवा आवाज बसला असेल तर सुंठ टाकून हळदीचा काढा घ्यावा. सर्दीने घसा खवखवत असेल तर हळदीच्या काढ्याने गुळण्या कराव्यात. मार लागलेल्या ठिकाणी चांगल्या अवस्थेत म्हणजे झाकून ठेवलेली हळदीची पूड दाबून धरल्यास रक्तस्राव लगेच थांबतो. मुका मार लागल्यास किवा सूज आल्यास हळकुंड पाण्यात उकळून गरम करून त्याचा लेप लावावा. दुधाची साय,हरभरा डाळीचे पीठ,हळद लेप करून लावल्यास चेहऱ्याचा वर्ण उजळतो.
७) सुंठ -
आल्याचा रस किंवा अद्रक बारीक करून साखरेत शिजवून त्याचा आलेपाक बनवतात.हा पाक भूक न लागणे,तोंडाला चव नसणे,पित्तामुळे मळमळणे डोके दुखणे यावर उपयोगी. अजीर्ण झाल्यास आल्याचा रस,लिंबाचा रस व सैंधव मीठ घ्यावे. सर्दी झाल्यास आले, दालचिनी, खडीसाखर यांचा काढा घ्यावा. पित्त मळमळ असल्यास सुंठाचे चूर्ण, साखर सारख्या प्रमाणात घेणे. लहान बाळास दुध पचत नसल्यास १ कपभर दुध चिमुटभर सुंठ, १०-१२ वावडिंग दाणे टाकून उकळून पाजणे.
८) ओवा -
पोटदुखी व अजीर्ण झाल्यास ओवा, कालेमीठ गरम पाण्यासह घेणे. पोटात जंत झाले असल्यास ओवा व नागिणीचे पण खाणे. पोटात गुबारा धरल्यास किंवा भूक लागत नसेल तर ओवा, चिमुटभर हिंग, सैधव मीठ गरम पाण्या बरोबर घेणे.
९) जेष्ठमध -
वारंवार खोकला येत असल्यास जेष्ठमध चूर्ण किंवा काडी ३-४ वेळेस चघळणे. मलप्रवृत्ती साफ होण्यास जेष्ठमध चूर्ण प्रत्येकी अर्धा चमचा रात्री झोपताना घेणे.
१०)देशी गाईचे तूप-
गायीचे तूप सर्वात उत्तम. अन्नाचे पचन होते, भूक वाढते. तुपाने स्निग्धता येते. उन्हाळ्यात तळपायाची आग होत असेल तर शतधौत घृत चोळावे. आग कमी होते.